Share

दारूची दुकानं उघडाल तर पुढच्या निवडणुकीला सत्ता गमवाल !

Published On: 

तामिळनाडू : कोरोनामुळे आज अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग धंदे हे आज बंद आहेत. उद्योगधंदे बंद असल्याने आज प्रत्येक राज्याला महसूलाची चणचण भासत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दारू विक्रीस सशर्त परवागी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अनेक राज्यांमध्ये दारू विक्रीस सुरवात झाली आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये ही दारू विकण्यास सुरवात झाली आहे.

मात्र तामिळनाडू सरकारने घेतला हा दारू विक्रीचा निर्णय साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना फारसा रुचलेला नाही. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. दारूची दुकाने उघडल्यास पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने सत्ताधारी अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाने पाहू नयेत. सरकारने महसूल वाढीसाठी पर्यायी मार्ग शोधावेत,असे रजनीकांत यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

राज्यातील मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला असून, त्याला स्थगिती द्यावी, अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर दुसºया दिवशी रजनीकांत यांनी हा इशारा दिला.

यावरून रजनीकांत यांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले, या कठीण दिवसांत मद्याची दुकाने पुन्हा सुरू केल्यास अ. भा. अद्रमुकला पुन्हा सत्ता मिळण्याची स्वप्ने पाहता येणार नाहीत. सरकारने तिजोरी भरण्यासाठी दुसरे चांगले मार्ग शोधावेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!