🕒 1 min read
मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षण, कोरोनाचा प्रसार, अनलॉकमधील सूट, अनेक धर्मातील येणारे सण-उत्सवाचं वातावरण, शेतकऱ्यांना मदत, यासारखे अनेक विषय सद्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह विरोधी पक्षांनी टीकास्त्र सुरूच ठेवलं आहे.
यातच, अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची आणीबाणीशी तुलना केली गेली. यासोबतच, लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेली प्रार्थनास्थळे इतर सर्व बाबी सुरु केल्यानंतरही बंद असल्याने अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचं नुकसान होत असून भाविक व देवाची ताटातूट केली जात असल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक आंदोलनाचा बडगा उचलला आहे. तर, मनसेने देखील यावरून राज्य सरकारवर टीका केली होती.
दुसरीकडे, मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल अद्यापही सर्वसामन्यांसाठी सुरु करण्यात अली नसल्याने अनेकांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे, सिनेमागृह, बार-रेस्टोरंट्स खुली केल्यानंतर आता तरी उद्धव ठाकरे याबाबत भाष्य करून मुंबईकरांना दिलासा देणार का? याकडे जनतेचं लक्ष्य लागलं आहे.
आज दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यावेळी ते सण-उत्सव काळात जनतेला खबरदारी घेण्याच्या आवाहनासोबतच आणखी कोणत्या विषयांवर भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर
- अजून एक दणका!, अर्णबचा मुक्काम आता ‘या’ कारागृहात!
- मी समाजाला तोडणार नाही, तर जोडणार आहे- बायडेन
- भारतीय वंशाची महिला अमेरिकन उपराष्ट्रपती होणार; जाणून घ्या या महिलेबद्दल
- पु.ल. देशपांडे यांना गुगलची डुडलद्वारे मानवंदना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
