मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीतसेच इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. (Chhatrapati Sambhaji Raje will go on hunger strike for Maratha reservation)त्यांच्या या उपोषणाला संपूर्ण राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांना ठाकरे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे. आता सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी ठोस भूमिका घेण्यासाठी संभाजीराजे आजपासून उपोषणाला बसणार आहेत. यासाठी राज्यातील विविध भागांतून मराठा तरुण मुंबईत दाखल होत आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहित आपण आमरण उपोषण करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाला स्थगिती देण्याआधी शासकीय सेवेत ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया झालेली आहे, त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. अशा अनेक मागण्या केल्या होत्या.
आज पुन्हा त्याच आझाद मैदानात मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या आंमलबजावणीसाठी युवराज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसत आहेत…#आझाद_मैदान#आमरण_उपोषण
(२/२)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 26, 2022
तर दोन दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसायचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती ! असे ट्वीट केले होते. तर आज त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “४ एप्रिल २०१३ रोजी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात महामोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चाची दखल घेऊन तत्कालीन सरकारने राणे समिती गठीत केली होती. आज पुन्हा त्याच आझाद मैदानात मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या आंमलबजावणीसाठी युवराज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसत आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
- राष्ट्रवादी नेत्याकडून अमृता फडणवीसांचा आक्षेपार्ह उल्लेख; भाजपचा इशारा
- IPL 2022: आयपीएलचे संघ दोन गटात वाटले जाणार ; वाचा कोणता संघ कोणत्या गटात
- “महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका…”, ईडीच्या धाडींवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- “…तर तुम्ही कपाळ करंटे”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
- युक्रेन-रशिया युद्धात चीनची उडी; शी जिनपिंग पुतीन यांना फोन करत म्हणाले…


