मुंबई : सोनी मराठी या वाहिनीवरील विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमातील कलाकांराना जेष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्य जत्रा’ची टीम करत आहे.’ असा शब्दात या कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक केले
अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ उपक्रमाचे यदांचे बारावे वर्ष होते. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊनविषयी बोलताना म्हणाले की,’निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्त्व पटते.’ असे वक्तव्य केले.
महत्त्वाच्या बातम्या
- दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ
- केएल राहुल फिरतोय आथिया शेट्टीच्या भावासोबत ; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स
- ‘प्राणी क्रूरता कायद्यानुसार भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांनी दिला चर्चांना पूर्णविराम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

