Share

नागपूर : पाणी का तुंबले याची चौकशी करून जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करू : मुख्यमंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ६ जुलैला नागपूर मध्ये झालेल्या पावसाने चांगलचंं थैमान घातलं होतं. संपूर्ण नागपूर जलमय झाले होते. एकूणच पावसाची परिस्थिती पाहता ६ जुलैला जून-जुलैच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडला होता. त्याचप्रमाणे नागपुरात मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पाणी तुंबले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले.याप्रकरणी चौकशी होऊन जे या प्रकाराला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

राष्ट्रवादी काँगेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांची जाहीर माफीची मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देताना हे सांगितले. तसेच पावसामुळे ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

साधारणपणे १२५ मिमी नागपूरची ड्रेनेजची क्षमता आहे. पण केवळ सहा तासांत २८२ मिमी पाऊस पडला. इतक्या पाण्याचा निचरा करण्याची कोठेही क्षमता नाही. त्यामुळे नागपूर जलमय झाले होते. मुंबईतही ज्यावेळी समुद्राला भरती येते. त्यावेळी पाण्याचा निचरा करणे कठीण जाते. आता तिथेही पंप वाढवले आहेत. त्यामुळे वेगाने पाण्याचा निचरा होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानभवनात सर्व व्यवस्था करणे गरजेचे होते, हे मान्य करत पाणी शिरल्यामुळे वीज पुरवठा बंद करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा बंद केला नसता तर शॉर्टसर्किटची शक्यता होती. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाईल. जाणीवपूर्वक कोणी केले असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. यावेळी त्यांनी पोलिसांचेही विशेष कौतुक केले. पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती चांगले काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

नागपुरातील या परिस्थितीवर विरोधकांनी भाजपला चांगलच धारेवर धरलं होत. सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करताना सरकारने पावसाळी अधिवेशन मुंबईऐवजी नागपूरला घेतलं. यासंबंधित सचिवांच्या अहवालानंतरही सरकारने अधिवेशन नागपुरात घेतल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यातील अतिरिक्त ७ लाख ९४ हजार घर बांधणीस मंजुरी द्या : देवेंद्र फडणवीस

सिडको घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – विखे पाटील

आता ‘यांना’ही मिळणार कर्जमाफीचा लाभ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!