मुंबई : आज महाराष्ट्र राज्याला ३० वे नवे मुख्यमंत्री मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुरवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होत. मात्र शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं.
यानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असा आग्रह व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे ट्विट देखील जे पी नड्डा यांनी करुन सांगितले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
आजचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोबत आहेत. त्यांच्या साथीने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर ठाण्यात शिंदे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष देखील पहायला मिळाला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

