मुंबई : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे भव्य सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. संदीपान भुमरे यांच्यावर या सभेची पूर्ण जबाबदारी आहे. या सभेला मराठवाड्यामधील मोठे दिग्गज नेते तसेच भाजप नेत्यांनीही देखील उपस्थिती लावली होती. या सभेला होणारी गर्दी ही पैसे देऊन जमवलेली गर्दी असल्याचे आरोप राजकीय वर्तुळातून आरोप होत आहेत. तसेच यावेळी या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील टार्गेट केलं.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळीकडे कॅमेरा घेऊन जातात, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. अजित पवारांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही अशाच ठिकाणी जातो ज्या ठिकाणी कॅमेरा नेता येतो. इतर लोक कुठे जातात तिथे कॅमेरा नेता येत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले, फोटो काढायला लोक माझ्याकडे येतात. मी कधीच फोटोग्राफर घेऊन जात नाही. बाकी लोक कुठे कॅमेरे घेऊन जातात मला माहीत नाही. त्यांचे त्यांनाच माहीतेय. काही लोक म्हणतात, मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात. पण मी सांगतो कालपर्यंत मी त्यांच्याकडे जात होतो. आज मुख्यमंत्री झालो तर मी त्यांच्याकडे का जाऊ नये. लोक मला म्हणतील की, हा बदलला. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, टीका करणे विरोधकांचा धंदा आहे, त्यांना टीका करू द्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात. मी त्यांना सांगतो की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचे काम करतो, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Shinde । “एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांनो याच साबणानं तुमची धुलाई केली हे विसरु नका”
- Eknath Shinde । सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Cabinet Meeting Decision | नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन होणार
- Eknath Shinde | लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत – एकनाथ शिंदे
- Rain Update | राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! NDRF, SDRF च्या ६ तुकड्या तैनात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा


