🕒 1 min read
मुंबई : राज्यातील सत्तांतर नंतर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर वारंवार टीका करताना दिसत आहेत. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पैठणमध्ये पार पडली. संदीपान भुमरे यांच्यावर या सभेची पूर्ण जबाबदारी होती. या सभेला मराठवाड्यामधील मोठे दिग्गज नेते तसेच भाजप नेत्यांनीही देखील उपस्थिती लावली होती. या सभेला होणारी गर्दी ही पैसे देऊन जमवलेली गर्दी असल्याचे आरोप राजकीय वर्तुळातून आरोप होत आहेत. मात्र यावेळी दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकांना शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
सामनामधून मुख्यमंत्री शिंदे आणि शिंदे गटावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. सामनाच्या रोखठोक मध्ये एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे अशी टीका करण्यात आली होती. पण याच साबणाने तुमची मस्त धुलाई केली हे विसरू नका असं म्हणत शिंदेंनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. सकाळी उठल्यावर टीका, दुपारी उठल्यावर टीका, रात्री झोपताना टीका. म्हणजे टिकेच सकाळ दुपार रात्रीचे तीन डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ काही थांबत नाही, असंही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळणे. मी एकदा शब्द दिला की माझं देखील ऐकत नाही. संदिपान भुमरे मला म्हणाले सत्तेतील घटकपक्षांकडून मुस्कटदाबी होत आहे. काय करायचं पुढच्या निवडणुकीत हातावर मोजण्याएवढे पण आमदार येणार नाहीत.
मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Shinde । सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Cabinet Meeting Decision | नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन होणार
- Eknath Shinde | लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत – एकनाथ शिंदे
- Rain Update | राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! NDRF, SDRF च्या ६ तुकड्या तैनात
- Eknath Shinde । दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती, आम्ही तुमचा रिमोट काढून घेतला; शिंदेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
