मुंबई : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे, असेही सांगितले.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल, हे लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृतीसाठी करावी.
तसेच रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहिम राबवावी. तसेच बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. यासाठी संबधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या भागात पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध रहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Rain Update | राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! NDRF, SDRF च्या ६ तुकड्या तैनात
- Eknath Shinde । दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती, आम्ही तुमचा रिमोट काढून घेतला; शिंदेंचा टोला
- Kishori Pednekar | नारायण राणे साहेबांची इमेज महाराष्ट्राला माहिती आहे – किशोरी पेडणेकर
- Kishori Pednekar | “विश्वासघातकी बॅकग्राऊंडचे लोक” ; किशोरी पेडणेकरांचा नारायण राणेंवर घणाघात
- Ajit Pawar | “कुणी आमदार उठतो, बंदुक काढतो, दादागिरी करतो” ; अजित पवार शिंदे सरकारवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

