Share

Phone Tapping Case | शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला धक्का! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या प्रकरणाचा तपास ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांना दिला होता. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहभागाची चौकशी देखील पोलिसांनी केली होती. त्यांचे जबाब नोंदवले होते. दरम्यान सरकार बदलताच ही प्रकरणे आता सीबीआयकडे सोपवण्यात आली आहेत.

राज्याच्या गुप्तचर विभागाकडून (SID) गंभीर आणि संवेदनशील कॉल रेकॉर्डिंगशी संबंधित माहिती लीक झाल्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने राज्य पोलिसांना दिले आहेत. दुसरा खटला भाजप नेते गिरीश महाजन आणि अन्य २८ जणांविरुद्ध खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी या संदर्भात मार्च २०२१ मध्ये अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. सरकारच्या कामकाजाशी संबंधित गुप्त माहिती लीक होत असून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अनेक लोकांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. दरम्यान देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होताच, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!