Share

NCP on Deepak Kesarkar | दीपक केसरकरांनी इतरांवर टीका करताना स्वतःचे रक्त तपासावे ; राष्ट्रवादीची खोचक टीका

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राचे उत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जात होते. त्याच ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी हे लोक कोणत्या थराला गेले, हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे या प्रकाराला सौदेबाजीच म्हणता येईल. महाराष्ट्रातील मतदारांना हे बिलकूल आवडलेले नाही, अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली.

शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी इतरांवर टीका करताना आधी स्वतःचे रक्त तपासावे. कारण ते स्वतः पहिल्यांदा प्रवीण भोसले यांच्या खांद्यावर पाय ठेवून मोठे झाले. तिथून ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये नारायण राणे यांच्यासोबत पटलं नाही म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. इथून ते आणखी कुठे गेले. त्यामुळे शिवसेना कुणामध्ये ठासून भरली आहे, हे बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असा टोला विद्या चव्हाण यांनी लगावला.

मुंबईतील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आरेचे पर्यावरणीय महत्त्व पाहता कारशेड कांजुरमार्ग येथे व्हावे अशीच मुंबईकरांचीही इच्छा होती. मात्र शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर ताबडतोब आरेमध्ये कारशेड बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे हे केवळ रबर स्टँप असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत. त्यामुळे आज फडणवीस आणि भाजपला शिवसेना फोडल्याचा आनंद होत असला तरी शिवसेना सहजासहजी फुटणार नाही. पुढील दीड-दोन वर्षात खरे चित्र लोकांसमोर येईल, असे त्या म्हणाल्या.

तसेच माध्यमातून उद्धव ठाकरे हे व्हिलन असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे यांनी जी गद्दारी केली, ती महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही, असेही त्या म्हणाल्या. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही विद्याताईंनी जोरदार टीका केली. तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन इतरांच्या खासगी आयुष्यात डोकावत आहात, मात्र तुमचेही खासगी आयुष्य आहेच. त्याबाबत जर अशाप्रकारे कुणी जाहीर वाच्यता केली तर? असा सवाल विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!