🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : तिरुमाला देवस्थान परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्रातील काही व्यक्ती एका कारने तिरुपती बालाजी देवस्थानचे दर्शन घ्यायला गेले होते. तिथून त्यांना तिरुमाला देवस्थान येथे दर्शनासाठी जायचे होते. मात्र तिरुमाला देवस्थानच्या अलीकडील चेकपोस्टवर त्यांची गाडी थांबवण्यात आली. कारण होते ते गाडीमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. या कारमध्ये स्टेअरिंगच्या वरच्या भागात शिवाजी महाराजांची एक मूर्ती होती. जर तिरुमाला देवस्थानला जायचे असेल तर ही मूर्ती काढावी लागेल, असं चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याचा दावा या कार मालकाने केला आहे.
यासंदर्भातला एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यात ते हि घटना सांगताना दिसत आहेत. तसेच त्यांनी असंही सांगितलं कि, त्यांनी चेकपोस्टशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला संपर्क साधला. मात्र त्यांनी देखील गाडीतील मूर्ती काढल्याशिवाय तिरुमाला देवस्थानला जात येणार नाही, असं सांगितलं असल्याचे व्हिडिओतील व्यक्ती सांगत आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या या महाराष्ट्रातील नागरिकांनी तिरुमाला देवस्थान परिसरातील गाडीवरचे तिरुमाला देवस्थानचे फोटोही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जर शिवाजी महाराजांचा फोटो, मूर्ती चालत नाही, तर मग या देवांचे फोटोही गाडीवर नको, असं म्हणत या संतप्त नागरिकांनी देवाचे फोटो नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता या घटनेत सत्य नक्की किती आहे, हे सांगता येणं सध्या तरी शक्य नाही. मात्र यासंदर्भात तपास झाल्यास सर्व गोष्टी स्पष्ट होतील. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Khaire | “आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मोठे झाले, त्यांनाच विसरले” ; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघात
- Sanjay raut | “त्यांची राजकीय तिरडी उठणारच”- संजय राऊत यांची जहरी टीका
- Devendra Fadnavis : उदयनराजे नेहमीच भक्कमपणे आमच्या पाठीशी असतात – देवेंद्र फडणवीस
- Sadabhau Khot : “इतिहास तपासून मगच बोला…”, सदाभाऊंनी घेतला आदित्य ठाकरेंचा समाचार
- Amol Kolhe | वढू-तुळापूर संभाजी महाराज स्मारक विकास निधीवर स्थगिती ; अमोल कोल्हेंचा शिंदे सरकारला प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
