Share

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे फक्त हिंदूंचे नाही तर रयतेचे राजे होते – काँग्रेस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने नामकरणाला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.

आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंलय. यानंतर भाजपसह मराठा क्रांती मोर्चाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेचा निषेध केला आहे.

यासंदर्भात, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी अधिक भाष्य केलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते, केवळ हिंदूंचे नव्हे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या मुलांचे शहाजी आणि शरीफजी ठेवले होते ते तत्कालीन सुफी संत शाह शरीफजी यांच्या वरील श्रध्देने ठेवले होते. त्यांचे १/३ सैन्य मुस्लिम होते.’ असा दावा त्यांनी केला आहे.

‘त्याचबरोबर ते केवळ मराठा समाजाचे राजे नव्हते तर अठरापगड जातींचे ते राजे होते. ज्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला संभाजी महाराजांनाही त्यांनी विरोधच केला. त्याकाळी जातीविरहीत धर्मनिरपेक्ष राज्य या महापुरुषांनी , आमच्या दैवतांनी स्थापन केले.’ असं देखील सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!