Share

जागतिक आरोग्य संघटनेने ‘या’ लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही देशामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.यातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान,ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.
करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

दरम्यान, देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. आज  देशातील सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ‘ड्राय रन’ घेतली जाईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

या ड्राय रन लसीकरण साठी राज्यातील पुणे नागपूर जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांत प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रावर हे लसीकरण सुरू करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!