Share

नाशकात छगन भुजबळांच्या हस्ते ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेला सुरुवात

Published On: 

नाशिक : नाशिक शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकच्या गंगापूर रोड येथील सद्भावना पेट्रोल पंप या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरात हेल्मेट सक्ती व्हावी यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबविली जात आहे.

यावेळी छगन भुजबळ यांनी आमदार सरोज अहिरे यांना हेल्मेट परिधान केल्यानंतर पेट्रोल देण्यात आलं. तर हेल्मेट घातलेल्या पोलिसांना देखील प्रातिनिधीक स्वरुपात भुजबळ यांच्याकडून पेट्रोल देण्यात आलं. अपघातामध्ये हेल्मेट घातलेलं असल्यास जीव वाचू शकतो, असंही छगन भुजबळ म्हणाले.

हेल्मेट नसल्याने अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. हा निर्णय राबविण्यापूर्वी लोकांना पुरेसा अवधी दिला आहे. फरक एवढाच आहे, की शासन निर्णय असला तरी यापूर्वी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नव्हती. स्वातंत्र्य दिनाचा संकल्प म्हणून या निर्णयाला महत्त्व देऊन नागरिकांनी निर्णय राबविल्यास नाशिक हे स्वतच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणाऱ्यांचे देशातील पहिले शहर ठरणार आहे. नाशिकला हा मान मिळावा म्हणून प्रत्येक नागरिकांचे यात योगदान असावे असे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले.

हेल्मेट सक्तीसंदर्भातील सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी शहरातील पेट्रोल पंप चालकांना दिल्या आहेत. ज्या पेट्रोल पंपावर सूचनांचं पालन होणार नाही, अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येकाला ही हेल्मेट सक्ती असल्याने पोलीस आयुक्त कार्यलयाकडून शहरातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना देखील हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!