Share

अरुण जेटली यांनी आपल्या युक्तिवादपूर्ण वक्तृत्वाने भल्याभल्यांना गारद केले- छगन भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आज जन्मदिवस असून या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. दरम्यान राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही ट्वीट करत अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्या कार्याला उजाळा देत अभिवाद केले आहे.

‘आपल्या युक्तिवाद पूर्ण वक्तृत्वाने भल्याभल्यांना गारद करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजकीय प्रवासास विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात झाली होती. जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवतानाच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता. विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कायदा मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द प्रचंड गाजली होती.अरुणजी जेटली यांना विनम्र अभिवादन!’ असे ट्वीट छगन भुजबळ यांनी केले आहे.

दरम्यान १९९१ पासून अरुण जेटली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. तसेच १९९९मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला. तसेच २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांना सर्वच स्तरातून अभिवादन केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!