पुणे : महाराष्ट्रातील एनसीबीच्या कारवायांवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. ‘मोदी सरकार गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी करत आहे,’ असा आरोप भुजबळांनी केला आहे. तसेच या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळालाय, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे, असे म्हणत त्यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावरही टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळ म्हणाले की,’गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असे करत सर्वांचे लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणलं जात आहे. न्यायालयानं हे सर्व ऐकून निर्णय दिलाय. आता आर्यन खानला जामीन मिळाला आणि पकडणारा अधिकारी कायद्याविरोधी काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे.’
दरम्यान, ‘मागील १५ दिवसांच्या गोष्टी पाहिल्या तर भारत सरकारच्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजप विरोधी सरकारं जिथं आहेत तिथं तिथं अतिरेक करत आहेत. त्यामुळेच या सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी चुकीचं काम करत आहेत आणि जनतेला त्रास देत आहेत हे समोर येतंय. समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत हे सिद्ध झालंय. त्यांचे निकाहनामे बाहेर आलेत. नवाब मलिकही मुस्लीम आहेत. या प्रकरणात हिंदू मुस्लीम असण्याचा काहीही संबंध नाही. भाजप सरकार महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करत आहे. लोकांना त्रास देत आहे. हे सर्व उघड करण्याचं काम नवाब मलिक यांनी केले आहे,’ असेही यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी’, मलिकांच्या मुलीने ट्वीट करत दिले टीकाकारांना प्रत्युत्तर
- ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील- छगन भुजबळ
- ‘शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली’
- ‘काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात पण राष्ट्रवादीवर भरोसा नाही, आम्ही त्यांच्या सलगीला भूलणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

