🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराने Cheteshwar Pujara) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत (IND vs SA) टीम इंडियाच्या चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय संघ योग्य तयारीने आगामी कसोटी मालिका जिंकू शकतो, असा विश्वास पुजाराला आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या शोधात आहे. यापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर एकही मालिका जिंकलेली नाही. 2017-18 मध्ये, भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका 2-1 ने गमावली.
कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी bcci.tv वर बोलताना पुजारा म्हणाला की, “भारताची संतुलित फलंदाजी यजमानांच्या वेगवान गोलंदाजांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. तो म्हणाला, भारताची फलंदाजी अधिक संतुलित आहे. त्यामुळे मला वाटते की आम्ही त्यास सामोरे जाऊ शकू आणि आमच्या तयारीसह, मला खात्री आहे की आम्ही चांगली कामगिरी करू.”
पुढे पुजारा म्हणाला, “भारतासाठी या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या चेतेश्वर पुजाराला वाटते की, घरच्या परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी मोठे आव्हान आहे. मात्र, मागील दौऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे पुजाराला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत हे माहीत आहे.
तो म्हणाला, बहुतेक संघ घरच्या परिस्थितीत चांगले खेळतात. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचीही तीच स्थिती आहे. त्यांच्याकडे सर्वोत्तम गोलंदाजी लाइनअप आहे आणि त्यांचा सामना करणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. मी पहिल्यांदा इथे आलो तेव्हा डेल स्टेन आणि मोर्ने मोर्कल दोघेही त्यांच्या शिखरावर होते. मी 2013 आणि 2017 मध्ये पुन्हा दौरा केला. त्यामुळे काय अपेक्षित आहे हे मला समजते.
महत्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
