औरंगाबाद : मौजेसाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकुन फिरणा-या तरुणाला पोलिसांनी क्रांतीचौकात पकडले. ही कारवाई सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस नाईक गुलाब भोसले हे कर्तव्य बजावत असताना क्रांतीचौकातून सोमीनाथ भाऊसाहेब सोनवणे (२४, रा. तुकार्बाद खराडी, ता. गंगापूर) हा बनावट क्रमांक टाकुन दुचाकीने (एमएच-२०-सीझेड-७९०९) जात असताना संशयावरुन त्याला ताब्यात घेतले.
त्यावेळी ई चलन मशीनवर दुचाकीचा क्रमांक तपासला असता तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सोमीनाथ सोनवणे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुध्द क्रांतीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

