🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. अशातच राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठी आर्थिक मदत केली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना ५ कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे’ अशी माहिती दिली आहे.
माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे. pic.twitter.com/78yiDY8D2D
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 12, 2019
दरम्यान, राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
तसेच शिर्डीच्या साई संस्थानानेदेखील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. तसेच डॉक्टरांची टीम औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच उस्मानाबाद इथल्या तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना २५ लाख रुपये रोख रक्कम, २५ लाख रुपये किंमतीच्या वस्तू अशी एकूण ५० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे.
-
अशावेळी निवडणुकांचा विचारचं कसा येतो ? उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला
-
#महापूर : पूरग्रस्तांसाठी अर्ध्याचं तासात शरद पवारांनी जमवेल १ कोटी रुपये
-
पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे : शरद पवार
-
पूराचं राजकारण नको, सर्वांनी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत करा : मुख्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
