Share

रिक्षाचा पाठलाग करत सोन्याची गंठण हिसकावून दूचाकी स्वार फरार

Published On: 

औरंगाबाद : लिंबेजळगाव येथे पल्सरवर आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी रिक्षाचा पाठलाग करून वीस वर्षीय विवाहितेच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाचे व अंदाजे ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून आरोपी सुसाट फरार झाले. ही घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

औरंगाबाद येथील विशाल चिंतामणी व त्यांची पत्नी योगिता चिंतामणी (२०) हे एका लहान बाळासह रिक्षा (एमएच २०, बीटी ६५४६) ने नेवासा येथून औरंगाबादकडे येत होते. वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबेजळगाव त्यांची रिक्षा येतात रस्त्यात उभ्या असलेल्या एका पल्सर दुचाकीवरुन दोघांनी रिक्षाचा एक किलोमीटर पाठलाग करत दोन-तीन वेळा रिक्षाच्या मागे पुढे गेले.

त्यानंतर पाठीमागे बसलेल्या एकाने योगिता चिंतामणी यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला. या गंठणची किंमत अंदाजे ४९ हजार रुपये असून घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!