कोल्हापुर: कोल्हापुरात सोमवारपासून (20 जुलै) सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली होती. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते, ज्यात आता बदल करण्यात आले आहेत.
आता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फेर आदेश काढत जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या नियमात काही बदल केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार ते रविवार असे सात दिवस कडक लॉकडाऊन आहे. मात्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार ग्रामीण भागातील एमआयडीसी, सहकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. बँकेची मुख्य कार्यालयेही सुरु राहणार आहेत. तर दूध संकलन आणि विक्री पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे, टीव्ही ९ मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
‘महादेव जानकर यांनी दुधाला देशात एक नंबरचा दर देण्याचे ऐतिहासिक काम केले’
दरम्यान, कोल्हापुर शहरासह जिल्ह्याच्या इतर भागात रुग्णांचे वाढते प्रमाण हि चिंतेची बाब आहे. शहरातील कोरोना आकडा आटोक्यात जरी असला तरी त्याची वाढ थांबवणं हे महत्वाचं असल्याने शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. कोल्हापुर हे खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. आज लोकडाऊनच्या आदल्या दिवशी मांसाहारप्रेमींनी गटारी जोरदार साजरी केल्याचे मटण विक्री दुकानांबाहेरील रांगा वरूनच समजून येत होते.
तर, या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वजण प्रयत्न करुया, कोरोना संकटाचा मुकाबला करुया”, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना केलं आहे.
…तर लॉकडाऊन करावाच लागेल, कसलीच तडजोड नाही ; महसूलमंत्र्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

