संगमनेर : लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून संगमनेर तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नाही तर लॉकडाऊन करावाच लागेल, असे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रविवारी येथील शॅम्प्रो संस्थेच्या प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. बकरी ईद असेल किंवा गणेशोत्सव कोणतेही सण, उत्सव काळजीपूर्वक साजरे करावेत. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यात कुठलीही तडजोड करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राम मंदिराच्या भूमीपूजनावरून पवारांचा टोला
याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, एसएमबीटी संस्थेचे विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, नायब तहसीलदार सुधाकर सातपुते उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. मागील चोवीस तासात देशात तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ५४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १० लाख ७७ हजार ६१८ वर पोहचली आहे.
‘महादेव जानकर यांनी दुधाला देशात एक नंबरचा दर देण्याचे ऐतिहासिक काम केले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

