मुंबई- राज्यातील दूध उत्पादक शेतकयांना गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये अनुदान द्या, प्रती लिटर दुधाला तीस रुपये खरेदी दर द्या आणि दूध भुकटीकरिता प्रती किलो ५० रूपये अनुदान सोमवार २० जुलै रोजी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना दूध भेट व भाजपा महायुतीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. राज्य शासनाने तातडीने दूध प्रश्नावर न्याय निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात दूधदरात झालेली घसरण व अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी महायुती शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहून न्याय देण्याची भूमिका घेईल. तत्कालीन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दुधाला देशात एक नंबरचा दर देण्याचे ऐतिहासिक काम केले आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.’प्रभात’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
राज्यव्यापी दूध आंदोलनाच्या अनुषंगाने महायुतीची लाईव्ह बैठक पार पडली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये महायुतीच्या काळात शेतकऱ्याला प्रतिलीटर 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करीत किमान प्रतिलीटर 27 रुपये दूध दर देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय तत्कालीन दुग्धविकास मंत्री जानकर यांनी घेतला. अडचणीतील शेतकऱ्यांना आधार दिला आहे. आत्ताच्या काळात शेतकरी मोठा अडचणीत आला आहे. दूध दरासाठी रासप रस्त्यावर उतरली असून त्यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्ष एकत्रित येणार आहेत.
आज रविवार १९ जुलै रोजी महायुतीचे नेते देवेंद्रफडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, रासपाचे महादेवराव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाई आठवले गटाचे अविनाशजी महातेकर, शिवसंग्रामचे विनायकराव मेटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. अनिलजी बोंडे, सुरेशजी हळवणकर तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
धोका वाढला : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ११ हजाराच्या पुढे
भारतीय रेल्वेविरुद्ध चिनी कंपनीची कोर्टात धाव
केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!
राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

