सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या आढावा दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी, ‘आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल,’ अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारला टोला लगावला होता. यावर आता भाजपाचे अनेक नेते प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी देखील आता शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून ट्विट करत टीका केली आहे. ते म्हणतात, ‘ राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही – साहेब, पावसात भिजूनही पंतप्रधान होणार नाही – जनता,’ असे ट्विट करत अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली आहे.
#राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही – साहेब
पावसात भिजूनही पंतप्रधान होणार नाही – जनता
— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) July 19, 2020
दरम्यान, अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने काल (शनिवार) एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राम मंदिराच्या भूमीपूजनावरून पवारांचा टोला
या भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होत.
‘महादेव जानकर यांनी दुधाला देशात एक नंबरचा दर देण्याचे ऐतिहासिक काम केले’
तसेच, निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी परीक्षेची व्यवस्था: उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

