Share

काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचं नेतृत्त्व काय करणार – प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार तसेच कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात राज्य सरकार कारभार करण्यात अपयशी ठरले आहे. अकोला आणि नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने हे दाखवून दिले. नागपूरमध्ये काँग्रेसची ४० ते ४५ मते फुटली. नागपूरमध्ये भाजपचा जवळपास १७६ तर अकोल्यात १८६ मतांनी विजय झाला आहे.

यावेळी बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करत म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडीला नागपूर आणि अकोला-वाशिमची जागा राखता आली नाही. या निवडणुकीत त्यांची मतंही फुटली. त्यामुळे ज्यांना स्वत:च्या जागा आणि पक्षाची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार, अशी जोरदार टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!