Share

‘निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहू नका, सरकार भाजपचेचं येणार आहे’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतही सत्ता भाजपकडेच राहिल, सरकार भाजपचंच येणार आहे हे शरद पवारांना सांगा. ते अजूनही विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत आहेत अशा शब्दात पाटील यांनी पवारांवर तोफ डागली आहे.

पुढे बोलताना पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत शरद पवार यांना बारामतीच्या निकालाची शाश्वती नव्हती. निकालात काही गडबड होते का अशीच शंका त्यांना होती. इतकी निकराची लढाई भाजपनं या मतदारसंघात दिली असंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बारामतीच्या जागेवर भाष्य करताना त्यांनी बारामतीची जागा कोणाला द्यायची याबाबत खलबतं सुरू आहेत. मात्र, ही जागा कुणालाही मिळाली, तरी येथे प्रचंड ताकदीनं निवडणूक लढवू असं विधान केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!