Share

‘राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते राहो ना राहो, त्यांच्या नावासमोर नामदार कायम राहील’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 87 व्या जयंती दिनानिमित्त गुरुवारी लोणी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. प्रवरा परिवार आणि लोणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यानिमित्त राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री राम शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात पाटील म्हणाले, राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते राहो ना राहो, त्यांच्या नावासमोर नामदार कायम राहील. चंद्रकांत पाटील यांच्या सूचक विधानानंतर भाजप प्रवेशानंतर विखेंची राज्यात थेट मंत्रिपदावर वर्णी लागणार, ही चर्चा रंगली आहे

विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे विखेंनी दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यातही आला आहे. मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजुर करायचा बाकी आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राधाकृष्ण विखेही मुलापाठोपाठ भाजप प्रवेश करतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!