🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिंदे गट आणि भाजप पक्षाच्या नेत्यांना समान वाटप करण्यात आले. परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला सहा जिल्ह्यांचे पालक मंत्री केले आहे. त्यामुळे यामुद्यावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा जिल्हे कसे सांभाळणार असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधाला होतो. नाना पटोलेंच्या याच वक्तव्यावरून भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
नाना पटोले हे देवेंद्र फडणवीस यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. त्यांनी आधी स्वत:च्या मतदारसंघात बघावं. मग इतरांवर टीका करावी, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे. बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात आणि मुख्यमंत्री असताना, जी विकासकामे केली. त्याची एक टक्का बरोबरीसुद्धा नाना पटोले करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना वर्ध्याची तसेच महाराष्ट्राची सखोल माहिती आहे. देवेंद्र फडणवीस संपूर्ण अभ्यास केलेले नेते असल्यासंही बावनकुळे यांनी म्हटलं.
तसेच नाना पटोले यांनी स्वत:च्या जिल्ह्यात जाऊन आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, हे बघितले पाहिजे. शेतकऱ्यांचे बोनस महाविकास आघाडी सरकारने देऊ केले होते. ते शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यांच्या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्याकडे नाना पटोलेंनी लक्ष द्यावं, असं बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | संतोष बांगर ताफ्यावरील हल्ला प्रकरणी शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- Devendra Fadnavis | “सत्तेवर असताना यांनी केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायचं काम केलं आणि आता…”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
- Santosh Bangar । “…तर त्यांना दाखवलं असतं”; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया
- Santosh Bangar । शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला
- Devendra Fadnavis | “मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय. मग, सहा जिल्ह्यांचं काम घेऊन बसलात”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
