Share

“छगन भुजबळांची समता परिषदेच्या माध्यमातून नौटंकी”; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज(३ जाने.)पत्रकार परिषद घेत भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार तसेच ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bujbal) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना बावनकुळे म्हणाले की,’एकीकडे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात शब्द देतं, की तीन महिन्यात आम्ही डेटा देतो आणि दुसरीकडे समता परिषदेला पुढे करून, ते आपले कपडे वाचवण्याचं काम करत आहे. छगन भुजबळ समता परिषदेच्या नावाने राजकारण करताय, नौटंकी करत आहेत, या वयात त्यांना हे शोभत नाही’, असे खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीत वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पुढे बावनकुळे म्हणाले की,’राज्य सरकारने तीन महिन्यांच्या आत आपले वचन पूर्ण करावे आणि निवडणूक आयोगाने मात्र ज्या निवडणुका लागल्याच नाहीत. त्या निवडणुका ओबीसींविना घेऊ नयेत.’ तसेच धनदांडग्या लोकांना गरीब ओबीसींच्या हक्काच्या जागा मिळवून देण्याचे नियोजन या सरकारने जाणीवपूर्वक केले आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!