मुंबई : काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत 30-40 आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय तुम्हाला जर जायचं असेल तर आताच जा,असं मी म्हटलं असल्याचं सांगितलं. ठाकरेंच्या याच वक्तव्यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर ?
एकीकडे दारे खुली आहेत असं म्हणायचं. दुसरीकडे पाठीमागून माणसं पाठवायची. याला संस्कृती म्हणतात का? , असा सवाल करत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. केसरकरांनी सांगितलं, माझ्यामागे यांनी गाड्या लावल्या होत्या. मी फोन करून सांगितले. ज्याला जायचं तो खुल्यामनाने स्वाभिमानाने जातो. पाठीमागून माणसं पाठवायची ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांची परंपरा राखण्याचं काम केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली त्यांनी कुठेही मेळावे घ्यावेत. त्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलवावं त्यावर आमचं काही म्हणणं नाही.
आमच्याकडे खिळाडूवृत्ती आहे
तसेच, जय पराजय हा मोकळेपणाने स्वीकारायचा असतो. त्यालाच आपण खेळाडू वृत्ती बोलतो. आम्ही आयुष्यभर खेळाडू राहिलो. वेगवेगळे खेळ खेळलो त्यामुळे आमच्याकडे खिळाडूवृत्ती आहे. आम्ही हरलो तर हरलो म्हणतो, जिंकलो तर जिंकलो म्हणतो आणि अशीच लोक जिंकत राहत असल्याचं केसरकर यांनी सांगितलं
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणाले…
- Uddhav Thackeray | वशंवादावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाले…
- Shivsena Melava: फडणवीस ही तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray । गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका; उद्धव ठाकरेंच शिवसैनिकांना आवाहन
- Uddhav Thackeray | महिनाभरात निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान


