🕒 1 min read
मुंबई: सांगलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. ‘राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी ६० वर तो गेला नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती. आता त्यांच्या या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सांगलीत शरद पवारांचा एकेरी उल्लेख अनावधानाने झाला आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. ते विरोधक जरी असले तरी अनादर कधीच नाही. अनेक वेळेला मी त्यांची स्तुती करताना असं म्हणत असतो, की प्रमोदजी आम्हाला सांगायचे मुख्यमंत्री होताना शरद पावर यांनी ४० गोष्टी लिहून काध्य्ल्या. त्यापैकी ३८ गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अनावधानाने जो उल्लेख झाला आहे, राष्ट्रवादीकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यावर मला म्हणावे वाटते की आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसाचा अनादर हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू संस्कृतीने आम्हाला शिकविलेले नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आता त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला

