Share

‘हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावंच्या गावं पाण्यात गेल्याने अनेक संसार देखील उध्वस्त झाले आहेत.

अशात शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांना तातडीने आणि भरीव मदत करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. तर पुराच्या कारणावरून आता आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झालं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुराचे कारण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आणि भरीव मदत यावरून ठाकरे सरकारला सुनावलं आहे.

‘शेतकऱ्यांचे अत्यंत अतोनात नुकसान झालेले असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र शेतात जाण्याची तसदी देखील घेतली नाही, उलट कार्यालयात बसूनच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेच नसल्याचा अहवाल सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रणच राहिले नाही हे यावरून स्पष्ट होते,’ अशी टीका पाटील यांनी केली आहे.

पुढे ते म्हणतात, ‘आधीच्याच नुकसानाचे पंचनामे अद्याप अर्धवट आहेत, त्यातच आताच्या संकटाने पुरत्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांपुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा आहे, त्यामुळे कुठल्याही पंचनाम्याशिवाय मदत जाहीर करा आणि ती गरजूंपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्या. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीची फार गरज आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही. आश्वासनांचा बाजार मांडणं आतातरी बंद करा आणि नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना त्वरित मदत करा,’ अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!