औरंगाबाद : राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट प्रत्येक शेतकऱ्यांना ५०,००० रूपये रोख स्वरुपात त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी केली आहे. या संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेले पत्रही दाशरथे यांनी विभागीय आयुक्तांच्या सुपूर्त केले आहे. त्यानुसार तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आलेल्या आदेशाचे पालन करत जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे आणि शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे निवेदन सुपूर्त केले. यामध्ये प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ५०,००० रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात द्यावी, अशा मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.
यावेळी शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, अशोक पवार, चंदू नवपूते, बाबुराव जाधव, राहुल कुलकर्णी आदींची उपस्थित होते. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात राज्य सरकार पंचनाम्याचा फास आवळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ‘अपमान झालाय, आता काँग्रेसमध्ये राहणारच नाही’, अमरिंदर सिंग यांची घोषणा
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

