कोल्हापूर : आज कोल्हापूरमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टिकास्त्र उगारले. याचसोबत ‘महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही.मुळात तिन्ही पक्षात सुसुत्रता नसल्याने आरक्षण कोर्टात टिकले नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घरी बसून कधी चर्चा केली नाही. काँग्रेसला देखील मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यात रस नसल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून राज्य चालवणारे मुख्यमंत्री आहेत. सारथी संस्थेची देखील या सरकारने वाट लावली असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली.
पहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1055071774896201/
महत्वाच्या बातम्या :
- सरकारचे विदर्भातील जनतेकडे लक्ष नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- मागील १५ वर्षात झाली नाहीत इतकी विकासकामे आगामी पाच वर्षांत करणार- निलेश लंके
- उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना हवी आहे भाटगिरी,चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला
- ‘कंगना राणावत’ हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं; सचिन सावंतांचा कंगनाला टोला
- खाजगी शिकवण्या सुरु असतील तर फौजदारी कारवाई करण्यात येईल – बच्चू कडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

