Share

दक्षिण आफ्रिकेच्या “बेबी एबी”ची आयपीएलमध्ये “या” संघाकडून खेळण्याची इच्छा!

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा अंडर १९ संघातील स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने विश्वचषक २०२२ मध्ये खेळत आहे. त्याने या स्पर्धेत केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे ‘बेबी एबी’ हे नाव मिळाले आहे. १८ वर्षीय डेवाल्डची फलंदाजी स्टाईल सुद्धा एबी डिव्हिलियर्ससारखीच स्फोटक आहे.

डेवाल्डची फलंदाजी धमाकेदार आहे. त्याने ९० च्या सरासरीने आणि ८६ च्या स्ट्राइक रेटने ३६२ धावा केल्या आहेत. तसेच यंदाच्या अंडर १९ विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक शतक आणि तीन अर्धशतके केली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याचे त्याचे अंतिम स्वप्न आहे . त्याने आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि विराट कोहलीसोबत खेळायला आवडेल असे सांगितले. “माझ्यासाठी देशासाठी खेळणे हे सर्वात मोठे स्वप्न आहे. मी आयपीएलचाही खूप मोठा फॅन आहे, ज्यात मला आरसीबीकडून खेळायला आवडेल. कारण एबी आणि कोहली तिथे आहेत,”

https://twitter.com/QuickWristSpin/status/1486599681719169025?s=20&t=9jAn1nf0AOlUg6AO7m9mpw

डेवाल्डने यावेळी आयडल एबी डिव्हिलियर्स सोबत झालेल्या चर्चेबद्दलही सांगितले. त्याने १७ नंबरची जर्सी घालण्यापूर्वी एबीकडून परवानगी घेतली होती. “ एबीने १७ नंबरची जर्सी घातली होती. मी फक्त त्याकडे पाहिले. मग मी एबीला विचारले की , तो १७ नंबर मी हि ठेवू शकतो का आणि तो म्हणाला “नक्कीच तुझे स्वागत आहे ”. त्यामुळे ती जर्सी घालणे हा माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. देवाल्डने मेगा ऑक्शनसाठी नाव दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!