Share

राष्ट्रवादी, शरद पवार यांच्याशी आपण एकनिष्ठ, ‘या’ खासदाराने केला दावा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही. वाऱ्याची दिशा फिरेल तसं विरोधी पक्षाचे आमदार टोपी फिरवू लागले आहेत.

नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. सुनील तटकरे काही खासगी कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर गेले होते. यानंतर तटकरे भाजप प्रवेश करतील अश्या आशयाच्या बातम्या माध्यमांमधून प्रसारित होऊ लागल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपण एकनिष्ठ असल्याचं, खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांनी एक ध्वनिचित्रफीत जारी करून, ही माहिती दिली. आपल्या रागयड मतदार संघात रस्ते बांधणीच्या कामांसाठी आपण चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेईल, असा आशावादही तटकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर बुधवारी हे चारही जण भाजपवासी झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजीमहिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला फक्त ४ नाही तब्बल ४० आमदार आमच्या संपर्कात आहे असं विश्वास गिरीश महाजन यांनी देखील व्यक्त केला आहे. यामुळे भाजप-सेना बळकट होताना दिसत आहे, मात्र आघाडी खिळखिळीत होत आहे.

नेमकं काय म्हटलं आहे तटकरेंनी ?

माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात काल महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. मात्र याबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत. मी काल केवळ चंद्रकांत पाटील यांनाच भेटलो नाही तर चार मंत्र्यांना भेटलो, त्यात शिवसेनेचे मंत्रीही होते, तसेच चार सचिवांनाही भेटलो.

दापोली येथील कुणबी समाज संघाला जागा मिळवण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांना भेटलो. गुहागर, दापोली, खेड, मंडणगड येथील हायब्रीड अॅन्यूटीमधील रस्त्यांबाबतही त्यांना भेटलो. काल पर्यटनमंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे राज्यमंत्री दादाजी भुसे, तसेच काही सचिवांनाही भेटलो.

लोकसभा निवडणुकीत मी जी कामे करण्याचे आश्वासन दिले होते, त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मी या सगळ्यांना भेटलो. माझे विचार, माझी निष्ठा केवळ आदरणीय शरद पवार साहेबांसोबत आहे. अफवा पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या भेटींसंदर्भात उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल आणि त्यावेळी मी आणि माझा रायगड लोकसभा मतदारसंघ आदरणीय खा. शरद पवार साहेबांसोबत भक्कमपणे उभे असू.

महत्वाच्या बातम्या 

माहिती अधिकार आयोगाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा सरकारचा डाव – सुनील तटकरे

अश्लील ट्रोल प्रकरण : केतकी चितळे राज ठाकरेंच्या भेटीला

भाजपच्या इनकमिंगबाबत चंद्रकांत दादांनी केला खुलासा, म्हणाले…

येत्या 13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार : चंद्रकांत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!