Share

संजय राऊतांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर;म्हणाले,‘माझी दृष्टी तपासायला…’

Published On: 

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पाटलांना खडे बोल सुनावले. तद्पश्चात आता राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले होते की,’या संपूर्ण देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. शिवसेना असे मेडिकल कॅम्प घेत असतं. जर कोणाला गरज असेल तर त्यांच्यावर उपचार करु. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे.’

दरम्यान, राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत पाटील म्हणाले की,’माझी दृष्टी तपासून घ्यायला, माझं नेतृत्व समर्थ आहे. मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन सामाजिक, राजकीय काम करतो त्या संघाकडे तर ती उत्तम व्यवस्था आहे. संजय राऊत यांनी माझी काही काळजी करू नये. महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही, हे पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांमधील दहा हजार लोकाचा प्रामाणिक सर्वे घ्या मग ते सांगतील की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आलेले नाहीत,’ असेही पाटील यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!