🕒 1 min read
भंडारा: किरणा दुकानातून वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भाजप नेत्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. परंतु, आता किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यास विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हल्लाबोल केला होता. सर्वात जास्त दारू पिणारे भाजपमध्ये आहेत असा टोला नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना लगावला होता. यावर त्यांनी तोंड सांभाळून बोलावं, असं प्रतयुतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
सध्या राज्यात बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) देखील याच वाईनच्या मुद्द्यावरून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलने देखील केली आहेत. तसेच सातारा पोलिसांनी (Satara Police) बंडातात्या यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वकतव्यांमुळे अटक देखील केली आहे. त्यांनी केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बंडातात्या यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, बंडातात्या कराडकरांनी जे म्हटले, ते म्हणायला पाहिजे होते की नाही, ते माहिती नाही. परंतु त्यांच्या नेत्यांना ते म्हटलं होतं, म्हणून त्यांना लागलं. आता त्यांनीही सांभाळून बोललं पाहिजे, असं पाटील म्हणाले. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या:
-
‘इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!
-
‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
-
औरंगाबाद शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा-चंद्रकांत खैरे
-
संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
-
अमृता फडणवीसांनी सांगितला ‘त्या’ ट्विटचा अन्वयार्थ, “म्हणाल्या मागून वार करणाऱ्यांना…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
