🕒 1 min read
पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरून विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय.
युवा वॉरियर्स अभियानात बोलताना पाटील यांनी देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगितलाय. काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असल्याचं पाटील यांनी म्हंटलय.
आपला सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध आहे. मात्र, काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.
दरम्यान, यावर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत भाष्य केले आहे. ‘एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले. तेंव्हा मोदींमुळे झाले हे सांगितले नाही. आता अटलजी व एपीजे अबुल कलाम ही नाहीत. चायवाला म्हणून व पदवी घेताना कोणी पाहिले नाही. मोदींच्या बाललीलांचे पुरावे द्यायचेच नसल्याने भविष्यात मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असेही चंद्रकांत पाटील बोलू शकतील’, अशा आशयाचे ट्वीट करत सावंत यांनी चंद्रकांत पाटीलांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- ‘रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का?’
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
