मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवरून राज्यात गदारोळ सुरु असून कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने केलेल्या कारवाईवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
ट्विट करत चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसापासून कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढला आहे या वादाला इतके महत्व देण्यासारखे काहीच नव्हते परंतु महाराष्ट्राच्या जनतेने दुर्लक्ष करावे यासाठी शिवसेनेने हि गोष्ट लावून धरली आणि तिच्या मागे लांडग्या सारखे लागले, असा आरोप पाटलांनी यावेळी केला आहे तसेच “हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे परंतु महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून मानाने साडी चोळी देऊन पाठविले होते परस्त्री विषयी आदरयुक्त धोरणाचा महाराजांनी नेहमीच आदर केला आणि हीच महाराष्ट्राची संस्कृतीआहे असे ते म्हणाले.
” सत्ताधारी पक्षाने एका स्त्रीला अशी धमकी देणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही . महाराष्ट्र आणि मुंबईची काळजी खरंच सत्ताधारी पक्षाला असेलतर त्यांनी आपल्या प्रशाकीय कामात दाखवावी महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांमुळे जनता त्रास आहे मुंबई त्रस्त आहे त्या प्रश्नांवर लक्ष केंद्रात करावे”, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
दरम्यान कंगना रनौत मुंबईत दाखल होतोच उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याचे चिन्ह आहेत.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही… pic.twitter.com/58emZjiaNE
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 9, 2020
‘कुठल्याही टॉम , डिक आणि हारीने केलेल्या मुख्यमंत्र्यांचा अनादर स्वीकारणार नाही’
राहुरीच्या लॉकडाऊनला व्यापार्यांचा विरोध
कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

