अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही दिवसांत राहुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे संपूर्ण राहुरी तालुक्यात गुरुवार १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ह्या लॉकडाऊनला राहुरीतील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दुकाने बंद ठेवणार नसल्याची भूमिका स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतली आहे. यासंदर्भात तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात व्यापाऱ्यांनी म्हटले, पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे राहुरी तालुक्यातील छोटे व्यवसायिक, रिक्षावाले, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व इतर छोटे-मोठे व्यावसायिक यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. अनेक व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. आपल्याला कोरोनाला सोबत घेऊन जगायला शिकावे लागेल अन्यथा कोरोनाच्या अगोदर भूकबळीने जनतेचा मृत्यू होईल. त्यामुळे राहुरी शहर व तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन करू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
निवेदनावर बाबासाहेब साठे, अनिल जाधव, नबी शेख, कल्याण जगधने, गणेश पवार, संदीप गायकवाड आदींच्या सह्या आहेत. आता राहुरी तालुक्यातील अनेक व्यापाऱ्यांनीच लॉकडाऊनला विरोध दर्शविल्याने, उद्यापासून राहुरी तालुका १००% लॉकडाऊन होणार की नाही ते पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:-
मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे व्यथित, समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करू : देवेंद्र फडणवीस
कंगना राणावतची बाजू घेणाऱ्यांनो २६ /११ च्या हल्यातील शहीदांचे योगदान आठवा…
हे सर्वात घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार : देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

