🕒 1 min read
Chandrakant Patil | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन केले. याआधी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंवर टीका केली होती. “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा”, असं संजय राऊत म्हणाले होते. यावर भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आज पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केलीय.
संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजीराचाच आहे. त्यामुळे किमान शिंदे गटाच्या खंजिराला एक पार्श्वभूमी आहे.” हिंदुत्वाचा विसर पडल्यामुळे आणि ते असह्य झाल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली असल्याचं चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; मंदा खडसेंची याचिका फेटाळली
- Sushma Andhare | “मोदी टेलिप्रॉम्प्टरवर अन् शिंदे फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
- Sushma Andhare | “डोळ्याला पाणी लाऊन म..म म्हणणारे हिंदुत्व…”; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Sushma Andhare | “गुजरातला मुख्यमंत्री आहेत की” ; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचे होणार पुनरागमन?, सुनील शेट्टीने दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

