मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे . रश्मी ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांचं अभिनंदन केलं, तसेच त्या खूप चांगलं काम करतील असंही सांगितलं. मात्र, या मुद्यावरुन चंद्रकांत पाटलांनी ठाकरे कुटुंबावर टीकाही केली.
“रश्मी वाहिनींना खूप खूप शुभेच्छा. आमचं सरकार असतांना त्यांना मी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद घ्या, म्हणून आग्रह धरला होता. उद्धव ठाकरे यांना मी स्वतः बोललो होतो. मात्र, ‘ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही’, असं त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं. पण आता ठाकरे सगळंच घेत आहेत. कुठलाही अनुभव नसताना त्यांनी मुलाला कॅबिनेट मंत्री पद दिलं. आता वहिनींना संपादक केलं. वहिनी सामनाचं संपादक पद खूप चांगल्याने सांभाळतील”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला.
तर दुसरीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील रश्मी ठाकरे याचे अभिनंदन केले आहे. अमृता फडणवीस म्हणतात,सामनाच्या संपादकपदी विराजमान झाल्याबद्दल रश्मी ठाकरे तुमचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.आपल्या देशात अधिकाधिक महीलांनी उच्च पदावर जाऊन महिला , समाजातील महत्वाचे विषय याच्यावर बोलण्याची गरज आहे . यासाठी समाजिक हीताच्या महत्वाच्या मुद्दयांवर मत मांडण्याचं व्यासपीठ महीलांना उपलब्ध व्हावं’ असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

