Share

Chandrakant Patil | शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती?, चंद्रकांत पाटलांचा खुलासा म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पक्षात मोठी दरी निर्माण झाली आहे. विरोधकांकडून यासगळ्यामागे भाजप पक्ष असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्ष कधी फुटला याबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील 

दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आपले सरकार येईल, असं मी सांगत होतो.  काही ना काही संदर्भ माझ्या मनात होते. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. 40 जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधली गेली आणि आपले सरकार आणले, असं पाटलांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला मोठं धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाही,

एकनाथ शिंदे यांना अंतर जाणवू देणार नाही

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला जेव्हा पक्षाने पुण्यात पाठवले, तेव्हा अनेकांनी मला नावं ठेवली होती. मात्र, तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत याचा पूर्णपणे विचार करण्यात आला होता. तसेच एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला मोठं धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!