🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी लांबलचक भाषण केले. यावेळी भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेल्याची चर्चा आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील हा आरोप केला आहे.
एकनाथ शिंदे यांचे भाषण वेळेपेक्षा जास्त लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांनी उशीर होत असल्यामुळे सभेतून काढता पाय घेतला. यापूर्वी शिंंदे गटाने परराज्यातून सभेसाठी माणसे आणल्याची चर्चा होती. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले आहे.
यानंतर आता आणखीन एक फोटो व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. पण शिंदेंचे एक मंत्रीच चक्क शिंदेच्या भाषणावेळी झोपी गेले. त्याचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दोन तासाहुन अधिक वेळ चाललेल्या एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे प्रमुख प्रवक्ते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचे फोटो समोर आले आहे. या दोन्ही घटनांमुळे शिंदे गटाला मात्र टीकांना सामोरी जावं लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nushrratt Bharuccha | ‘अकेली’ मध्ये दिसणार ‘नुसरत भरुचा’चा थ्रिलर अंदाज
- Eknath Shinde । एकनाथ शिंदेंचं ते ट्विट अमृता फडणवीसांनी केलं रिट्विट; म्हणाल्या…
- MNS | “खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची सवय जुनी”; मनसेचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Shivsena । “आधी पक्ष फोडला आता घर फोडण्याचं काम सुरु”; शिवसेनेचा शिंदे गटावर घणाघाती आरोप
- Weight Loss Tips | झोपण्यापूर्वी ‘ या ‘ गोष्टी करून वजन कमी करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
