Share

chandrakant khaire | “गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा”

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  महाराष्ट्र राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच निवडणुकांचंही वारं घुमू लागलं असून, सगळे पक्ष आगामी निवडणुकींच्या तयारीला लागले असल्याचं दिसून येतं आहे. इतकच नाहीतर काही पक्षातील नेत्यांनी दौरे करायलाही सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक आवाहन दिले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?

औरंगाबाद जिल्ह्यात एकही शिवसैनिक फुटला नाही, फुटले ते गद्दार. या गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. औरंगाबाद शहर युवासेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संमारंभ होता, त्यावेळी ते बोलत होते. याठिकाणी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे देखील उपस्थित होते.

तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी जिल्हा समनव्यक दत्ता शेलार, उपजिल्हा युवाधिकारी प्रकाश धुर्वे, शहर युवधिकारी स्वप्निल दिंडोरे, आदित्य दहिवाळ, रामेश्वर कोरडे, शहर समनव्यक विशाल सानप, भागीनाथ रिठे, चिटणीस मनोज क्षीरसागर, देविदास रत्नपारखी, उपशहर चिटणीस साईनाथ थोरवे, उपशहर अधिकारी नितेश थट्टेकर, समाधान बनकर, आकाश पोळ, शुभम साळवे, सागर राऊत, किरण गायकवाड, साहिल लहाने, ऋषिकेश तोरणमल यांचा सत्कार करण्यात आला.

खैरेंचे नक्कल करत बावनकुळेंना प्रत्युत्तर –

समारंभ झाल्यानंतर खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सुरूवातीला खैरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे कसे बोलतात याची नक्कल करून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला बावनकुळे हे खूपच ज्युनियर आहेत, असं म्हणत खैरेंनी बावनकुळेंवर चांगलाच पलटवार केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!