औरंगाबाद : मुंबई येथील कुलाबा हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात २७ आणि २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत औरंगाबाद विभागातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची सुचना निर्गमित करण्यात आली आहे. ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानुसार २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

