Share

राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता

Published On: 

पुणे – बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात प्रामुख्यानं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या काही भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील काही भागांमध्ये आज आणि उद्या गडगडाटी वादळं आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

आज मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी राज्याच्या सर्वच भागात राहील. उद्यापासून पावसाचा जोर हळूहळू कमी होऊ लागेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर काल रात्री धडकल्यानंतर गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. छत्तीसगडकडे जाताना आज हे वादळ दुपारपर्यंत ओडिशातून पुढे सरकण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळानं प्रभावित झालेल्या भागातून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. ओडिशाच्या काही जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून हलका ते मध्यम पाऊस अधूनमधून पडत आहे. कोरापुट, रायगडा, गजपती आणि मलकानगिरीसारख्या दक्षिण ओडिशातील जिल्हा प्रशासनानं भूस्खलन होण्याच्या आधी सुमारे चाळीस हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!