Share

Maharashtra Rain Update | मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा!

Published On: 

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेलता पावसाने दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. याचबरोर पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यात अजूनही ऑरेंज अलर्ट सुरू आहे.

मुंबईत शुक्रवारी पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं, यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसंच लोकल सेवेवरही पावसाचा परिणाम झाला होता. लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत होत्या. पुण्यातही पावसाचा जोर वाढला असल्यानं बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला.

तर काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील अनेक भागात पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. आज हवामान विभागान रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!